• अध्ययन-अक्षमता आणि मुले

'Children and Learning Difficulties' या पुस्तकाचे शारदा बर्वे यांनी केलेले मराठी रूपांतर.

शिक्षणाच्या पारंपरिक चौकटीत यशस्वी होऊ न शकलेल्या मुलांना आणि प्रौढांना समाज पटकन दोषी धरतो. मात्र खरी गरज असते ती त्यांच्यातील क्षमतांना असणार्‍या मर्यादांसह त्यांच्याकडे डोळसपणे पाहण्याची. मानसशास्त्रातील (सायकॉलॉजी- इं.) आणि मज्जामानसशास्त्रातील (न्यूरॉसायकॉलॉजी- इं.) प्रगतीने आपल्याला ‘मानसा’कडे आणि  त्यामुळेच ‘माणसा’कडे पाहण्याची एक नवीन दृष्टी बहाल केली आहे. त्यामुळे हे आता शक्य झाले आहे. लेखन, वाचन व इतर अभ्यास याबाबतच्या शाळेच्या अपेक्षा काही मुले पुर्‍या करू शकत नाहीत. या मुलांना कोणत्या अडचणी येतात, त्या कशामुळे येतात व आपण त्यांना कशी मदत करू शकतो याचे विस्तृत विवेचन प्रस्तुत पुस्तकात आहे.‘शिक्षणाचा अधिकार’ सर्वांसाठी लागू झाल्याचे लक्षात घेता या पुस्तकाचे महत्त्व विशेष आहे. अध्ययन-अक्षमता या विषयाचा सखोल परामर्ष घेणारे हे मराठीतील पहिले पुस्तक आहे.पालक, शिक्षक, शिक्षणक्षेत्रातील पदाधिकारी, मानसशास्त्राचे अभ्यासक, रेमेडियल टीचर्स अशा सर्वांसाठी हे पुस्तक उपयोगी आहे.

Book Details
Product_Code 9788179254318
Binding Paperback
Language Marathi
Edition 1st
No Of Pages 200
Delivery Details
Estimated Delivery Delivery Within 5-6 Working Days

Write a review

Please login or register to review

अध्ययन-अक्षमता आणि मुले

  • Publication: Jyotsna Prakashan
  • Author / Model: ओनिता नाक्रा
  • Availability: 2
  • ₹300.00
  • ₹255.00

  • Ex Tax: ₹255.00